Skip to main content

सांगलीच्या तरूण तडफदार वकीलाने काढला पुण्यातील नामांकित सहकारी पतसंस्थेतील कोट्यावधींचा घोटाळा

सांगलीच्या तरूण तडफदार वकीलाने काढला पुण्यातील नामांकित सहकारी पतसंस्थेतील कोट्यावधींचा घोटाळा

न्यायालयाने गंभीर दखल घेत दिले चौकशीचे आदेश

सांगली येथील हरिपुरचे तरूण तडफदार वकील 'अँड. ऋषिकेश चव्हाण' यांनी पुण्यातील 'सारस' या सहकारी पतसंस्थेतील तब्बल 11 कोटींचा घोटाळा बाहेर काढला आहे. 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत 'पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. ए. अरगडे' यांनी आज 'वारजे माळवाडी पोलिस ठाण्याला' सारस नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यकारणी विरुद्ध तपास सुरू करायचे निर्देश दिले आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सारस पतसंस्थेचे संचालक व अध्यक्ष 'गणेश धारप' यांच्या व्यवस्थापनाखाली पतसंस्थेने कोट्यवधी रुपयांची कर्ज ही कर्जदाराची योग्य पत चाचणी, मालमत्तेचे मूल्यांकन वा व्यक्तीचे सिबील रेकॉर्ड या बाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून दिली गेली. तसेच कर्ज असणार्‍या मालमत्तांच्या 7/12 उतार्‍यांवर कर्जाच्या नोंदी होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे या जमिनी परस्पर विकता येत असत. असे सर्व गैरप्रकार हाताळण्यासाठी गणेश धारप याने वैकुंठ कुंभार नावाच्या कर्जदाराकडून २ कोटी रुपयांची लाच घेतल्याचेही तक्रारीमध्ये म्हणाले आहे. 

तसेच शेखर चरेगावकर नावाच्या खातेदारालाही गणेश धारप याने संचालक मंडळाच्या कोणत्याही पूर्व मान्यतेशिवाय वा कोणत्याही तारणाशिवाय मुदत ठेवीवर कर्ज व ओवरड्राफ्टची देखील सुविधा अशाच पद्धतीने उपलब्ध करून दिल्याचे समजते. 
शेखर चरेगावकर याचे नाव पुढे थकबाकीदारांच्या यादीत येऊन देखील चरेगावकर याच्या राजकीय वर्तुळातील ओळखी लक्षात घेऊन त्याच्यावर कोणतीही कारवाई पतसंस्थेने केली नसल्याचेही समजते. 

सारस पतसंस्थेतील या घोटाळ्याचे तक्रारदार व भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन फोलाणे यांच्या वतीने त्यांची बाजू मांडणारे अँड. ऋषीकेश चव्हाण यांनी त्यांची बाजु मांडत आपल्या वकीलीची पुणे येथे झणाटेबाज सुरूवात केली आहे. अँड. ऋषिकेश चव्हाण हे मुळचे सांगली जिल्ह्यातील 'हरीपुर' गावचे असुन नुकतीच त्यांनी पुणे येथे वकीलीला सुरूवात केली आहे. त्यांचे शिक्षण 'मुंबई येथील गव्हर्णमेंन्ट लॉ कॉलेज' मध्ये झाले असुन सुरूवातीचे काही वर्षे त्यांनी 'मुंबई हायकोर्टात' वकीलीदेखील केली आहे. सध्या त्यांनी पुणे यथे स्वताची लॉ फर्म स्थापन केली असुन त्यांनी त्यांच्या वकीलीला दमदार सुरूवात केली असल्याचे या प्रकारणावरून दिसुन आले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार हा घोटाळा ११ कोटी रुपयांइतका मोठा असेल असे समजते.
सहकारी पतसंस्था तसेच सहकारी बँकांमध्ये अशा स्वरूपाचे घोटाळे नित्याचे होत चालले असून या सहकारी संस्थांच्या मूळ संकल्पनेलाच धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. महाराष्ट्रात यापूर्वी 'पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक' व त्या पाठोपाठ 'शिवाजीराव भोसले सहकारी बँक' मधील अशाच पद्धतीचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर आले आहेत. सारस पतसंस्थेतील घोटाळा हा याच प्रकारचा अजून एक मोठा दखलपात्र गुन्हा संभवतो आहे.

Comments

  1. 👌👌👌👌
    ब्लॉग वाचुन फार छान वाटले.
    या नवख्या वकीलाने फारच छान काम केले आहे.
    लेखनाची ओघवती शैली वाचकांना ब्लॉग वाचण्यासाठी भुरळ घालते.
    पुढेही असेच लिहित चला..!👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची तपशीलवार यादी...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज कसा भरावा? – नियम, निकष, अटी, कायदेशीर तरतुदी व संपूर्ण मार्गदर्शन… ✍️ अ‍ॅड. अभिषेक खोत, सांगली मो. 9960661657 लोकशाही व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्था या विकासाचा पाया मानल्या जातात. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरील प्रशासन थेट जनतेच्या जीवनाशी संबंधित असते. याच व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास अशा मूलभूत विषयांवर थेट निर्णय घेण्याचे अधिकार या संस्थांना असतात. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून ग्रामीण लोकशाहीचा कणा आहे. मात्र अनेक इच्छुक उमेदवार केवळ उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यामुळे किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडतात. म्हणूनच या लेखात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडणुकीचा अर्ज कसा भरावा, त्यासाठीचे नियम, निकष, अटी, कायदेशीर तरतुदी, अंतिम मुदत आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती मांडली आहे. निवडणुकीचा कायदेशीर पाया - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या भारतीय...

गृहनिर्माण सोसायटीचे व्यवस्थापन: एक ‘विश्वस्त’ म्हणून अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांची कायदेशीर जबाबदारी

एका नामांकित गृहनिर्माण सोसायटीमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि नवीन व्यवस्थापन समिती स्थापन झाली. अध्यक्ष म्हणून श्री. ‘अ’, सचिव म्हणून ‘ब’ आणि खजिनदार म्हणून ‘क’ यांनी मोठ्या उत्साहाने पदभार स्वीकारला. सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत चालले होते. सभासद समाधानी होते, कामकाज व्यवस्थित होते आणि व्यवस्थापनावर विश्वासही होता. परंतु काही काळानंतर लिफ्ट दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या रकमांचे कंत्राट एका ठराविक कंत्राटदाराला देण्यात आले. या प्रक्रियेत आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही आणि सर्वसाधारण सभेची मंजुरीही घेण्यात आली नाही. काही महिन्यांनी या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. सभासदांनी सहकार न्यायालयात दाद मागितली. चौकशीत स्पष्ट झाले की निर्णय प्रक्रिया पारदर्शक नव्हती आणि उपविधींचे उल्लंघन झाले होते. अखेरीस न्यायालयाने अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या तिघांनाही वैयक्तिक जबाबदार धरून सोसायटीचे नुकसान त्यांच्या खिशातून भरून काढण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान भरपाई न दिल्यास त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवण्याचेही आदेश दिले. ही घटना केवळ एक उदाहरण ...

हौसिंग सोसायटीमधील पार्किंग : कायदे, उपविधी, नियमावली आणि सदनिकाधारकांचे अधिकार

आजच्या आधुनिक शहरी जीवनात घराइतकीच महत्त्वाची गरज म्हणजे वाहन पार्किंगची सुविधा होय. शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि मर्यादित जागा यांमुळे हाउसिंग सोसायटीमधील पार्किंग हा अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त विषय बनला आहे. पूर्वी एका कुटुंबाकडे एक वाहन असायचे; मात्र आज जवळजवळ प्रत्येक घरात दोन किंवा अधिक वाहने आढळतात. परिणामी अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगवरून सदस्यांमध्ये वाद निर्माण होतात. काही वेळा बिल्डर पार्किंग विकतो, काही सदस्य अतिरिक्त जागेवर कब्जा करतात, तर काहींना एकही पार्किंग मिळत नाही. अशा परिस्थितीत पार्किंगचे कायदेशीर स्वरूप, सोसायटीचे अधिकार, सदस्यांचे हक्क आणि लागू असलेले कायदे समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगसंदर्भातील प्रश्न हे प्रामुख्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अधिनियम, १९६३, महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अधिनियम, १९७०, रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) अधिनियम, २०१६, तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांचे नमुना उपविधी यांच्या आधारे निश्चित...